Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागरराष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन साजरामहावितरणला ग्राहकांकडून तक्रारींचा झटका ! ऊर्जा दरबारात चुकीच्या कामकाजावर प्रकाशझोत !!कोल्हापूरसह अनेक शहरात होणार महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे ! कृष्णराज महाडिकांचा पुढाकार, वोलू संस्थेची करारमानाचा राजर्षी शाहू पुरस्कार डॉ.जब्बार पटेल यांना जाहीर, 26 जूनला पुरस्कार वितरण समारंभ एआय, रोबोटिक्स अभ्यासक्रमाची सुरुवात करुन  विवेकानंदची शैक्षणिक चळवळीत आघाडी-प्रकाश आबिटकरकोल्हापुरात माळी भवन उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू –अमल महाडिकबांधकाम व्यासायिक- वास्तुविशारदांचे विकासाचे व्यापक व्हिजन शहराला गतीमान बनवेल-प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

नोकर भरतीचा जिप सोसायटीचा आदर्शवत पायंडा, सभासदांच्या मुलांनाच संधी ! संचालक मंडळाचा निर्णय !!

schedule08 Jun 25 person by visibility 197 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : सहकारी संस्थेतील नोकर भरती म्हटलं की चेअरमन आणि संचालकांची चांदीच. बहुतांश संस्थेत वारसदार आणि नातेवाईकांचीच वर्णी लावली जाते. सभासद हिताची भाषा भाषणापुरतीचअसेच सार्वत्रिक चित्र. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीने नोकर भरतीमध्ये आदर्शवत पायंडा पाडला आहे. नोकर भरतीत पात्र सभासदांच्या मुलांनाच संधी हे सूत्र निश्चित केले आणि त्या पद्धतीने नोकर भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, संचालक आणि सुकाणू समितीतील सदस्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित नोकर भरतीत कुटुंबांतील व्यक्ती नाही असे जाहीर केले. आणि अंमलात देखील आणले.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची प्रमुख आर्थिक संस्था म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शाळेतील शिक्षकही या सोसायटीचे सभासद आहेत. सातत्याने अ वर्ग ऑडिट प्राप्त करणाऱ्या सोसायटीने सभासद हिताचा कारभार हे सूत्र निश्चित केले आहे. संस्थेची स्थापना होऊन आज ५८ वर्षे झाली. सभासद व त्यांच्या पाल्यांसाठी विविध योजना राबविते. ३२४४ इतकी सभासद संख्या आहे. मार्च २०५ अखेर २११ कोटी ८८ लाखाच्या ठेवी आणि २१७ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल ८६४ कोटी ८५ लाखापर्यंत पोहोचली आहे. सभासद कुटुंब कल्याण कधी, सभासदांच्या मुलांसाठी अद्ययावत ग्रंथालय, सभासदांना १२.५० टक्के लाभांश वाटप याद्वारे ‘सेवेचा वारसा’ पुढे चालू ठेवला आहे.  सोसायटीच्या गडहिंग्लज, हातकणंगले, मुधाळतिट्टा, आणि बांबवडे येथे शाखा आहेत.

 संस्थेचे वाढते कामकाज, कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती यामुळे कामकाजावर ताण पडत होता. सध्याच्या संचालक मंडळाने व सुकाणू समितीने नोकर भरतीचा निर्णय घेतला. २०१३ नंतर पहिल्यांदाच भरती होत आहे. दहा जागा भरण्याचे ठरले. सहकार खात्याची परवानगी घेतली. दोन वरिष्ठ सहायक आणि आठ कनिष्ठ सहायक असे एकूण दहा जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वार्षिक सभेत, सोसाटयीच्या नोकर भरतीत पात्र सभासदांच्या मुलांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही सुरू केली. सभासदांच्या मुलांना संधी मिळावी यासाठी संचालक व सुकाणू समितीने कुटुंबांतील सदस्यांची भरतीत समावेश असणार नाही असा  निर्णय घेतला. नोकर भरतीतून स्वत:च्या कुटुंबांतील सदस्य नसतील असे जाहीर केले. वास्तविक पाच संचालकांचे मुले व सुकाणू समितीतील चार सदस्यांची मुले नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकले असते. मात्र सभासदांच्या मुलांनाच संधी हे सूत्र कायम करत नोकर भरती अतिशय पारदर्शकपणे राबविली. नोकर भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लेखी परीक्षाही झाली आहे. मुलाखत आणि निवड या बाबी शिल्लक आहेत. सभासदांनी, संचालकांच्या या कामकाजाचे वार्षिक सभेत कौतुक केले.

………………….

“ संचालक मंडळ व सुकाणू समितीने सोसायटीचा कारभार अतिशय पारदर्शकपणे केला आहे. नोकर भरतीत संचालक व सुकाणू समितीच्या सदस्यांची मुले असणार नाहीत असे जाहीर केले. आणि या प्रक्रियेपासून कुटुंबांतील सदस्यांना दूर ठेवत सभासदांना दिलेला शब्द खरा केला आहे. पात्र सभासदांच्या मुलांचीच नियमानुसार निवड होणार आहे. त्यांनी उत्कृष्ट कामकाज करुन सोसायटीचा नावलौकिक उंचवावा. ’’

-सुनील पाटील, चेअरमन कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes