Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आनंददायी शनिवारमध्ये विद्यार्थी गिरवणार राष्ट्रभक्ती- शिस्त-नेतृत्वगुणाचे धडे, माजी सैनिक देणार प्रशिक्षण !  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणीवळसंगकरांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकारले ! गुरुवारी उदघाटन समारंभ !! अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपकळंबा ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण, तलाव वाचविण्यासाठी हवी कठोर भूमिकातब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदनवरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरेसातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीस

जाहिरात

 

सेवा रुग्णालय आणखी सुसज्ज करणार, विस्तारीकरणासाठी मंत्रालयस्तरावर बैठक : आमदार राजेश क्षीरसागर

schedule26 May 25 person by visibility 69 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा लाईन बझार परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर कसबा बावडा ते शिये ग्रामीण भागापर्यंत सुमारे एक लाख नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णसेवेसाठी हे रुग्णालय सुसज्ज व्हावे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात. दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा याठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेले सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासमवेत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करू. नियोजित विभागांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या कामकाजाचा, समस्यांचा आणि रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी आमदार क्षीरसागर यांनी सेवा रुग्णालयास भेट दिली. याप्रसंगी आयोजित बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत रुग्णसेवेत सुधारणा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. उपसंचालक डॉ.दिलीप माने यांनी, नियोजित महिला, सिव्हील व क्रिटीकल केअर युनिट विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. बफर झोन असल्यामुळे परवानगी मिळत नाही. याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. हे विभाग सेवा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यास सद्यस्थितीत ५० खाटांचे असणारे रुग्णालयाची खाटांची संख्या वाढवून सुमारे २५० इतकी करता येईल. यामध्ये महिला विभागासाठी १०० खाट, सिव्हील विभागासाठी ५० खाट आणि क्रिटीकल केअर युनिट विभागाचे ५० खाटांची क्षमता असणाऱ्या इमारती प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.

महानगरपालिका अधिकारी एन.एस.पाटील यांनी माहिती देताना, लाईन बझार परिसरात असणाऱ्या झूम प्रकल्पाच्या आसपास असणाऱ्या ५०० मीटर अंतरापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बफर झोनची निर्मिती केली असून, या झोनमध्ये नवीन इमारत बांधकामास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रस्तावित विभागांच्या इमारतींसाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगितले.  बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, सहाय्यक अधीक्षक आयुब मुल्ला, वरिष्ठ लिपिक अजित कोळी, शिवसेना महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, कृष्णा लोंढे, रोहन उलपे, दादासो आळवेकर, रोहित चव्हाण, जय लाड, सचिन पाटील, आदर्श जाधव, सुरज सुतार, आकाश चौगुले, प्रणव इंगवले, किरण सुतार, प्रज्वल चव्हाण आदी उपस्थित होते.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes