Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आनंददायी शनिवारमध्ये विद्यार्थी गिरवणार राष्ट्रभक्ती- शिस्त-नेतृत्वगुणाचे धडे, माजी सैनिक देणार प्रशिक्षण !  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणीवळसंगकरांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकारले ! गुरुवारी उदघाटन समारंभ !! अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपकळंबा ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण, तलाव वाचविण्यासाठी हवी कठोर भूमिकातब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदनवरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरेसातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीस

जाहिरात

 

कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील

schedule27 May 25 person by visibility 96 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी सचिन धोंडीराम शिंदे ( न्यू इंग्लिश स्कूल नूल ता. गडहिंग्लज ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी ऋतुजा राजेश पाटील (विद्यापीठ हायस्कुल कोल्हापूर ) यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार होते . निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली .
      निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले . शाहुुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी सचिन शिंदे व व्हाईस चेअरमनपदासाठी ऋतुजा पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  शेलार यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले . चेअरमनपदासाठी   शिंदे यांचे नाव संचालक डॉ. दत्तात्रय घुगरे यांनी सुचविले तर अनुमोदन अनिल चव्हाण यांनी दिले. व्हाइस चेअरमनपदासाठी  पाटील यांचे नाव उत्तम पाटील यांनी सुचविले व अनुमोदन शरद तावदारे यांनी दिले. यावेळी संचालक बाळ डेळेकर,  राजेंद्र रानमाळे ,  राजाराम  शिंदे मदन निकम,  श्रीकांत पाटील  , श्रीकांत शिंदे, सुभाष खामकर , अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , जितेंद्र म्हैशाळे , प्रकाश कोकाटे, पांडुरंग हळदकर , मनोहर पाटील , आनंदा व्हसकोटी, शितल हिरेमठ आदीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे,  रमेश मेटील, नितीन शिंदे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते  लाड यांच्या हस्ते करण्यात आला . सभासदांनी ' स्वाभिमानी सहकार ' आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली . त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख  लाड यांनी यावेळी  दिली . 
    आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा व आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन  शिंदे व व्हाईस चेअरमन  पाटील यांनी केले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes