वरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरे
schedule27 May 25 person by visibility 2115 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग विस्कळीत झाले आहेत.त्यामुळे २ जून पासून सुरु होणारे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था संचालक राहुल रेखावार यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे प्रथमच रियल टाईम या प्रकारे आहे. या प्रशिक्षणातील प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन चाचणी आहे. चाचणी परीक्षा होणार आहे. व प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९: ३० वाजताची आहे. या प्रशिक्षणाला वेळेत हजर राहणे अत्यावश्यक असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे ओढे,नाले काही नद्या दुधडी वाहत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग विस्कळीत झाले आहेत.
पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा विस्कळीत होऊन प्रशिक्षणाचा हेतू साध्य होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करता २ जून पासून सुरु होणारे प्रशिक्षण पुढे ढकलावे.