गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदन
schedule27 May 25 person by visibility 39 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जाणीवपूर्वक गांधी मैदानात पाणी तुंबवून नुकसान करून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झाडे यांच्याकडे केली.गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा निर्माण केल्याचेही निदर्शनास आणले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गांधी मैदानासाठी पहिल्या टप्प्यातील ४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळविण्याचे काम सुरु आहे. परंतु, गेले काही दिवस या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज/ गटरची लाईन जाणूनबुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकाकडून केला जात आहे. यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे. गांधी मैदानातील साचलेल्या पाण्याचा निचरा सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही पाण्याचा मार्ग गाद्या, उशा, सिमेंट पोती टाकून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बुजविण्याचा प्रकार मुद्दामहून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्यापही प्रकार थांबलेले नसून, गांधी मैदानाचा वापर निव्वळ राजकारण आणि बदनामीच्या हेतूनेच केला जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत. निव्वळ स्टंटबाजीसाठी आंदोलने केली जात आहेत. यातून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी शिवसेना महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, उदय भोसले, दुर्गेश लिंग्रस, सुनील खोत, उपशहरप्रमुख सनी अतिग्रे, टिंकू देशपांडे, सुरेश माने, सचिन भोळे, श्रीकांत मंडलिक, मंदार तपकिरे, अर्जुन आंबी, सचिन क्षीरसागर, बाळासाहेब शेलार आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.