Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आनंददायी शनिवारमध्ये विद्यार्थी गिरवणार राष्ट्रभक्ती- शिस्त-नेतृत्वगुणाचे धडे, माजी सैनिक देणार प्रशिक्षण !  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणीवळसंगकरांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकारले ! गुरुवारी उदघाटन समारंभ !! अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपकळंबा ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण, तलाव वाचविण्यासाठी हवी कठोर भूमिकातब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदनवरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरेसातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीस

जाहिरात

 

तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतचा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीचा,  कामाला लवकरच मिळणार गती - आमदार अमल महाडिक

schedule26 May 25 person by visibility 1027 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : .  तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतचा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर मार्केट यार्ड- कावळा नाका- मध्यवर्ती बस स्थानक- दसरा चौक अशा मार्गाने जाणाऱ्या या उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवण्यात येणार आहे. करवीर पंचायत समितीला वळसा घालून स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्य मार्गाला तसेच पंचगंगा नदी घाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहत मार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाच्या तांत्रिक आराखडयाचे सादरीकरण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींची बैठक  झाली. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर सहभागी होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर,आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत, राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या बास्केट ब्रिज आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूलसंदर्भात विस्तृत चर्चा झाली. बास्केट ब्रिजवरून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश मिळणार असल्यामुळे तावडे हॉटेल येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. या बास्केट ब्रिजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी करावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. याच उड्डाणपुलाला मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रिज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे अशी सूचना आमदार  महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांनी केली.  हा उड्डाणपूल झाल्यास परीख पूलाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होईल असे मत आमदार महाडिक यांनी व्यक्त केले. या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड महापालिका प्रशासनाने करावी त्या कंपनीचे मानधन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिले जाईल असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. लवकरच यासंबंधी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

…………………….. 

टेंबलाईवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल पाडून विस्तारित उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात होणार पाहणी
टेंबलाईवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल पाडून विस्तारित उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात पाहणी करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. हॉटेल सयाजीच्या दारातून सुरू होणारा हा उड्डाणपूल शासकीय तंत्रनिकेतन शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत न्यावा असे मत महाडिक यांनी व्यक्त केले. यामुळे टेंबलाईवाडी चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संरक्षण विभागाच्या परवानगीचा मुद्दा मांडला. या विषयावर दहा जून रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार महाडिक यांनी दिले. कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता हेमा जोशी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes