Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!

जाहिरात

 

कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेजची सुरुवात 

schedule29 Sep 25 person by visibility 377 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्यावतीने रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज, कोल्हापूरतर्फे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमाच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. उमरानी जे म्हणाल्या, राज्यातील कॅन्सरविरोधी मोहिमेला यामुळे नवे बळ मिळणार आहे. हा उपक्रम राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या धोरणांतर्गत तसेच डीएमईआर आणि एमएसबीएनपीईच्या मान्यतेने राबविण्यात आला आहे. कॅन्सर नर्सिंग प्रशिक्षण क्षेत्रात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अग्रणी राहिले आहे. नंतर महाराष्ट्रातील दुसरे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज उदयास आले आहे. ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे.

डॉ. सूरज पवार म्हणाले, हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत नर्सेससाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारी रुग्णालयातील नर्सेसना कॅन्सर उपचारातील तांत्रिक कौशल्य मिळेल. खासगी रुग्णालयातील नर्सेसना व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून त्यांच्या सेवेला आंतरराष्ट्रीय मानांकनचा दर्जा येईल. ग्रामीण भागातील नर्सेसदेखील या प्रशिक्षणामुळे कॅन्सर रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील. रुग्णांना मानसिक व भावनिक आधार देतील. कुटुंबीयांना समुपदेशन व मार्गदर्शन करतील.
डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या, या कॉलेजच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या कॅन्सरविरोधी मोहिमेला एक सक्षम आधार मिळणार आहे. प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा उंचावेल. कॅन्सर उपचाराचा दर्जा सुधारेल. रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज केवळ नर्सिंग प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता भविष्यात संशोधन, शैक्षणिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्येही आपले स्थान निर्माण करेल.याप्रसंगी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ आर. एम. कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील
  यावेळी उपस्थित होते. प्राचार्य नागेश गुंडप यांनी आभार मानले. प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती : अंतिम मुदत : ३० ऑक्टोबर २०२५ इच्छुक नर्सेसनी ही संधी साधून व्यावसायिक ऑन्कोलॉजी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. संपर्क : प्राचार्य, रमाई ऑन्कॉलॉजी नर्सिंग कॉलेज, कोल्हापूर. मो. ८५३०३३३०३६. ई मेल - ramaionconursingclg@gmail.com

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes