महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानात शिक्षक घडविण्याचा संस्कार – डॉ. श्रीकृष्ण महाजन
schedule29 Nov 24 person by visibility 61 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानात शिक्षक घडविण्याचा संस्कार आहे. त्या शिकवण आणि संस्कारातून परिवर्तन शक्य आहे.”असे मत शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त केले.
कास्ट्राइब शिक्षक संघटनेतर्फे अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.याप्रसंगी डॉ. महाजन बोलत होते. ‘राष्ट्रपिता जोतिराव फुले आणि भारतीय संविधान’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी १९ शिक्षकांना महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. कास्टाइबचे राज्य नेते नामदेवराव कांबळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना नामदेव कांबळे म्हणाले, ‘कास्ट्राइब संघटना ही महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करते. गेल्या पंधरा वर्षापासून या दिनी गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचे संघटनेचे काम स्तुत्य आहे. ’ कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी प्रास्ताविक केले. संजय कुर्डूकर यांनी स्वागत केले.वैभव प्रधान यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी समाजकल्याण अधीक्षक सचिन पाटील, करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, शिक्षक बँकेचे संचालक अर्जुन पाटील, अमर वरुटे, शिवाजी रोडे-पाटील, गजानन कांबळे, आकाश तांबे, प्रमोद वाघोदे, प्रशांत मोरे, प्रमोद काकडे, संजय दाभाडे, शिवाजी ठोंबरे, आकाराम कांबळे, तुकाराम संघवी, विलास चौगुले आदी उपस्थित होते.