Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!

जाहिरात

 

शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहूंचे स्मारक, कापड पर्यटन केंद्रही उभारणार

schedule05 Mar 26 person by visibility 257 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. २१ एकर जागेत केल्या जाणाऱ्या प्रयोजनांचा आराखडा करण्यासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश दिले. यासह मिलमधील "चिमणी" कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीची आणि वैभवशाली इतिहासाची एक महत्त्वाची खूण आहे. चिमणीला कोणताही धक्का न लावता तिचे मूळ स्वरूप जपून संवर्धन करण्याचे निर्देश दिले. मिल्समधील कामगार संघटनेच्या घरकुलासाठी २००० मीटर जागा देण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करण्याबाबत वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी, पाच मार्च २०२६ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. पालकमंत्री प्रकाश् आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व राजर्षी शाहू महाराजांच्या नावे "टेक्स्टाईल टुरिझम हब" ला तत्वत: मान्यता दिली. वस्त्रोद्योग विभागाला २६ पैकी ५ एकर जागा घेवून त्यामध्ये अर्बन हट ही संकल्पना राबविली जाईल. याद्वारे कोल्हापुरातील स्थानिक हस्तकला अंतर्गत कोल्हापुरी चप्पल, साज, कापड उद्योग यांना एकाच छताखाली आणणे. राज्यातील विविध ठिकाणी निर्माण होणाऱ्या कापडास बाजापेठ उपलब्ध केली जाईल. यासह याठिकाणी प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करून वस्त्रोद्योग वाढीस आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. उर्वरित २१ एकर जागेचा महानगरपालिकेने आराखडा तयार करावा व त्यासाठी प्रशासनाने निधी खर्च करावा, असा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री यांनी दिला. 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, स्थानिक पातळीवर प्रकल्पाचा खर्च करण्यास मर्यादा असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत संयुक्तिक बैठक घेवून नगरविकास विभागाच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत हि मिल टेक्स्टाईल टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला.  आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अॅम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करावा.’  आमदार अमल महाडिक यांनी, केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून हि जागा विकसित करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी पत्रव्यवहार सुरु असून मार्च नंतर पुन्हा एक बैठक आयोजित करू. त्याचा आढावा घेवूया, अशी मागणी केली. बैठकीस सचिव अनुष्का सिन्हा, नगर विकास विभागाच्या सुशीला पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण पवार, उपसचिव तुषार पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव रामदास कोळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes