Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकर

जाहिरात

 

अर्जुनवाडा येथे रंगणार सुपर मॉम स्पर्धा

schedule05 Mar 26 person by visibility 118 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचा २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम स्वप्नपरी हॉल, अर्जुनवाडा  येथे उत्साहात पार पडणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी ६ मार्च रोजी सुपर मॉम स्पर्धा आयोजित करण्यात आली असून परिसरातील मातांसाठी विविध मनोरंजक फेऱ्या, कौशल्य चाचण्या व सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत मातांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

         ७ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सकाळी ११.०० वाजता  होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चांगुलपणाची चळवळीचे अध्यक्ष राज देशमुख उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील आहेत. तसेच जागतिक शिक्षणतज्ज्ञ आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील  यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी विद्यार्थिनींचा रंगतदार ‘गॅदरिंग’ कार्यक्रम होणार असून त्यामध्ये नृत्य, नाटिका, गीत-संगीत, फॅशन शो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.  या सर्व कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.या कार्यक्रमांना परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes