Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदम

जाहिरात

 

राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

schedule06 Mar 26 person by visibility 219 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील समिती सभापतीवरुन महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पाहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला परिवहन समिती सभापतिपद देण्याचे ठरले, मात्र त्यांना वेळेत निरोप मिळाला नाही. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मुदतीत महापालिकेत पोहोचू शकले नाहीत. यामुळे शिवसेनेकडून नगरसेवक सत्यजित जाधव यांचा उमेदवारी अर्ज परिवहन समिती सभापतीपदासाठी दाखल करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल शिराळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपच्या कौसर बागवान व उपसभापतिपदासाठी दीपा अजित ठाणेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेसनेही समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याचे इरादे स्पष्ट केले. महापालिकेच्या विविध समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, शुक्रवारी (सहा मार्च २०२६) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत होती. महायुतीमध्ये समिती सभापतिपदासाठी फॉर्म्युला ठरला आहे. त्या फॉर्म्युलानुसार स्थायी समिती सभापतिपदासाठी नगरसेवक शिराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून नगरसेवक अमर समर्थ यांचा अर्ज आहे.

परिवहन समिती सभापतिवरुन गेले काही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. सभापतिपद कोणाला हा पेच न सुटल्याने वरिष्ठापर्यंत हा विषय गेला. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचे ठरले. राष्ट्रवादीकडून नगरसेविका मानसी लोळगे यांचे नाव निश्चित होते. मात्र राष्ट्रवादीला यासंदर्भात वेळेत माहिती दिली नाही. यामुळे सायंकाळी पाच वाजत आले तरी राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले नाहीत. पाच वाजण्यास दोन मिनिटाचा अवधी असताना शिवसेनेकडून नगरसेवक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी परिवहन समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दहा मिनिटाच्या कालावधीत राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत पोहोचले. राष्ट्रवादीचे गटनेते फरास यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे वेळेत का कळविले नाही अशी विचारणा केली. भाजपवर आमचा राग नाही, पण कोणी आम्हाला गृहित धरत असेल तर योग्य नाही अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes