Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेच्या लेटलतिफ अधिकाऱ्यांना झटका, प्रशासकांकडून अर्धा दिवसाचे वेतन कपात कोल्हापूरसाठी राजेश क्षीरसागरांची सरकारकडे मोठी मागणी, शंभर एकरमध्ये हव आयटी पार्कची निर्मिती !वाहतूकीचे नियम पाळा, अपघात टाळा- चंद्रकांत मानेडॉ. अरविंद जत्ती यांचे शनिवारी व्याख्यानचित्रकार वैशाली पाटील यांच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शनजिल्हा नियोजन समितीची रविवारी सभाडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये वाचन संकल्प उपक्रमजिल्हा परिषदेतर्फे कॅरम स्पर्धेला सुरुवात, अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सहभागबी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळाराज्य मराठी चित्रपट पुरस्कारांत गाभ सिनेमाला तीन नामांकने

जाहिरात

 

विद्यार्थी-विद्यार्थिनींनो, निसर्गाचे संवादक बना : डॉ. जगन्नाथ पाटील

schedule29 Jan 25 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ सारे जग सध्या पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात आहे.शिक्षण घेणारे  विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची पुढची पिढी आहे. या पिढीने निसर्गाच्या संवर्धनासाठी संवादक बनून काम करणे गरजेचे आहे.’ असे मत जागतिक शिक्षणतज्ज्ञ आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले.

राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात  २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.याप्रसंगी ते बोलत होते.  डॉ. पाटील म्हणाले, ‘जगात मोठ्या प्रमाणात पर्यावरनाच ऱ्हास सुरु असून हे वेळीच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.  सर्व विद्यार्थिनींनी काही झाडे लावल्यास आणि पर्यावरण  विषयक जागृती चे काम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवल्यास येत्या काही वर्षांमध्ये आपण लाखो झाडे निर्माण करू शकू, ज्यातून तापमान वाढ आणि इतर गोष्टींना आळा बसेल.’

या वेळी प्रत्येक विद्यार्थिनीला रोप भेट देण्यात आले. ते रोप प्रत्यकाने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये लावण्याचा संकल्प केला. यासोबतच अशी शेकडो झाडे येत्या काळामध्ये लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.  तसेच ‘धरती मातेची सुरक्षा आणि संवर्धन’ याची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने २५००० हून अधिक झाडे लावून  जोपासली आहेत.  यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ  पी. जी. च्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या मनाली भंडारी, शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शिल्पा अरबुने उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes