डॉ. अरविंद जत्ती यांचे शनिवारी व्याख्यान
schedule30 Jan 25 person by visibility 255 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) शरण साहित्य अध्यासनाच्या कार्यारंभानिमित्त बंगळुरू येथील बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात डॉ. अरविंद जत्ती हे 'शरण साहित्य: संकल्पना आणि प्रासंगिकता' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि बसवकल्याण येथील अनुभव मंटपाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांची प्रमुख उपस्थिती असेल. या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. करेकट्टी यांनी केले आहे.