वाहतूकीचे नियम पाळा, अपघात टाळा- चंद्रकांत माने
schedule30 Jan 25 person by visibility 42 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात टाळता येतील असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी, ट्रॅफिक पोलिस व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान चर्चासत्रात केले. वाहतूक निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी १ जानेवारी ते ३१ जानेवारी अखेर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण देशात राबविले जाते. हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट घालणे हे आपल्या सुरक्षिततेसाठी फार गरजेचे असून आपण सुरुवात केल्यास त्याचे अनुकरण इतर लोकही करतील असे सांगितले.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविकात व्यापारी प्रामाणिकपणे कर भरत असतो. पण व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर पार्किंग केलेल्या गाड्या पूर्वकल्पना न देता टोवींग केल्या जातात. तरी व्यापाऱ्यांना माईकवरुन पूर्वकल्पना देऊन गाड्या टोवींग कराव्यात. कोल्हापूर डिस्रीरुक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोड सेफ्टी मिशन ऑफ युथ या पुस्तकाचे व वाहतूकीचे नियम पाळण्यासंदर्भात तयार केलेल्या पोस्टर्स चे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी सहायक मोटर वाहक निरिक्षक तेजस डोळस, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, खजिनदार राहुल नष्टे, संचालक प्रकाश केसरकर, संपत पाटील, अनिल धडाम, संभाजीराव पोवार, प्रकाश पुणेकर, राहुल मेंच, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, विश्वजित कोलते उपस्थित होते.धनंजय दुग्गे यांनी आभार मानले.