जिल्हा नियोजन समितीची रविवारी सभा
schedule30 Jan 25 person by visibility 52 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा रविवारी (२ फेब्रुवारी २०२५ ) दुपारी एक वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली आहे.
या बैठकीत सहा जुलै २०२४ रोजी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत दिनांक २० जानेवारी २०२५ अखेरील खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ प्रारुप आराखड्यास मान्यता देणे व आयत्या वेळेचे विषय होणार आहेत. जिल्हा नियोजन समितीची ही बैठक एक फेब्रुवारी २०२५ रोजी होणार होती, तथापि या तारखेत बदल होवून ही बैठक रविवार दोन फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.