Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेच्या लेटलतिफ अधिकाऱ्यांना झटका, प्रशासकांकडून अर्धा दिवसाचे वेतन कपात कोल्हापूरसाठी राजेश क्षीरसागरांची सरकारकडे मोठी मागणी, शंभर एकरमध्ये हव आयटी पार्कची निर्मिती !वाहतूकीचे नियम पाळा, अपघात टाळा- चंद्रकांत मानेडॉ. अरविंद जत्ती यांचे शनिवारी व्याख्यानचित्रकार वैशाली पाटील यांच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शनजिल्हा नियोजन समितीची रविवारी सभाडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये वाचन संकल्प उपक्रमजिल्हा परिषदेतर्फे कॅरम स्पर्धेला सुरुवात, अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सहभागबी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळाराज्य मराठी चित्रपट पुरस्कारांत गाभ सिनेमाला तीन नामांकने

जाहिरात

 

चित्रकार वैशाली पाटील यांच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शन

schedule30 Jan 25 person by visibility 101 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : दृश्यकला क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर गेली दोन दशके स्वतःच्या कलाकृतींची मोहोर उमटविणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रकार वैशाली पाटील यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुणे येथील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत ४ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत  होत आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. 

पाटील या कोल्हापुरातील रा.शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय येथे कला अध्यापक आहेत. दरम्यान पुणे येथील प्रदर्शनात प्रदर्शनात सुमारे सत्तरहून अधिक कलाकृती मांडण्यात येणार आहेत. यामध्ये कागद आणि कॅनव्हासवर ड्रायपेस्टल, इंक, ऍक्रेलिक कलर, ऑइल कलर, चारकोल इत्यादीचा वापर केलेला आहे. त्यांची चित्रशैली अलंकारिक, सुलभिकृत आणि विरूपीकरणात्मक आहे.तर ठिकाणी अमुर्ताकडे झुकणारी दिसते. त्यांच्या चित्रात भारतीय लोकपरंपरेतील प्रतिके आणि प्रतिमांचा उत्तम कोलाज पहावयास मिळतो.

  भारतीय शैव परंपरेतील स्त्री-तत्व आणि शिव-तत्वाच्या एकत्वाविषयी त्यांच्या सगुण-निर्गुण रूपाविषयीची अनेक उपाख्याने त्यांच्या कलाकृतीत सापडतात. त्यांच्या चित्रांचा अनुबंध हा शिव-शक्ती आणि स्त्री-शक्ती स्वरूपाचा आहे. त्यांच्या चित्रातून लोकसंस्कृतीचे आदिम रूप प्रतिकात्मक रूपाने प्रकट होते. अनुभव पूर्व आकारांना मूर्तरुप देण्याचा प्रयत्न दिसतो. अंत:स्थरीय रचना पृष्ठस्थरावर आणल्या जातात. विविध रंगांच्या खेळातून अंत:प्रज्ञेचा शोध घेतलेला दिसतो. जाणीव-नेणीव, दृश्य-अदृश्य, चल-अचल इत्यादी मधल्या सीमारेषा पुसून गेल्यावर जे वास्तव जाणवेल, ते त्यांच्या चित्रात दिसते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes