कोल्हापूरसाठी राजेश क्षीरसागरांची सरकारकडे मोठी मागणी, शंभर एकरमध्ये हव आयटी पार्कची निर्मिती !
schedule30 Jan 25 person by visibility 143 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरच्या विकासाला अंत्यत उपयुक्त ठरणाऱ्या आयटी पार्कची निर्मिती शंभर एकर जागेत करावी अशी महत्वपूर्ण मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. राज्याने दुसऱ्या दिवशी पर्यंत सुमारे १५ लाख ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता गेल्या अनेक वर्षात नवीन औद्योगिक प्रकल्प आलेला नाही. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील गुंतवणूक करारांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १०० एकर जागेत आय.टी. पार्क निर्मिती होण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याच्या, देशाच्या विकासात भर घालण्यासाठी राज्यातील इतर शहरे विकसित करण्याचा उद्देश मित्रा संस्थेने ठेवला असून, कोल्हापूर हे प्रथम शहर त्यासाठी निवडले गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील इतर "क" व "ड" वर्ग महापालिका हद्दीत आयटी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने शहरात आय.टी.पार्क स्थापन करण्याचा निर्णय शाश्वत परिषदेत घेण्यात आला याकडेही आमदार क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.