संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये मिलाप ॲल्युमिनी मीटला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule10 Feb 25 person by visibility 77 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी "मिलाप ॲल्युमिनी मीट २०२५" या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इन्स्टिट्यूट संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रत्येक विभागातील “उत्कृष्ट” कार्य करणाऱ्या विद्यार्थ्याना “डिस्टिङ्ग्विश्ट् ॲल्युमिनी २०२५” हा अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. विशाल तेली यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांचा उपयोग नवीन इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालक, डॉ. विराट गिरी यांनी, प्लेसमेंट आणि नवीन स्टार्टअप करण्यासाठी उद्योग जगतामध्ये काम करत असणाऱ्या माजी विद्यार्थांना इन्स्टिट्यूट अंतर्गत सहकार्य केले जाईल, ज्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट स्किल आहेत, त्यांनी नवीन इंजिनिअरिंग शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी विद्यार्थी अतिश शिंगे, वीरेंद्र भोसले, मनीष कुलकर्णी, सानिका गुरव, अनिस जगदाळे, प्रवीण आरगे, सार्थक गणबोटे, सुजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रणेत भोसले, निकिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.