Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरवअकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन ! गुणवत्तेनुसार सर्वसाधारण चार फेऱ्या!!शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!

जाहिरात

 

महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!

schedule08 May 25 person by visibility 48 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिकेच्या मालकीची ५४ उद्याने आहेत. मात्र सुस्थितीत एकही नाही अशी स्थिती.

अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत. लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी व त्याच्या वॉक-वे ला मोठे भगदाड पडले आहेत. ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेकवेळा सांगून देखील कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखे आंदोलन केले.  नीट देखभाल न झाल्यामुळे शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा झाला आहे अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आंदोलनस्थळी घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी महापालिकेच्या कारभाराचे विडंबन समोर आणले. 

पदपथ उद्यान, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान सदर बाजार, ताराबाई गार्डन, सिद्धार्थनगर मधील दादासाहेब शिर्के उद्यान, रेड्याची टक्कर येथील हुतात्मा स्मारक, इंदिरा गांधी बालोद्यान टेम्बलाईवाडी, श्रीराम उद्यान कसबा बावडा, शेळके उद्यान मंगळवार पेठ येथील वस्तुस्थिती आप पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. लहान मुलांसाठी असलेली खेळणी जर मोडलेली असतील तर त्यांनी खेळायचे कुठे असा प्रश्न आहे. ही मुले मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.

 यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, स्वप्नील काळे, रणजित पाटील, रमेश कोळी, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिलीप पाटील, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes