नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
schedule08 May 25 person by visibility 69 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या ई-सेल या विद्यार्थी व्यासपीठातर्फे नवोदित उद्योजक, भावी उद्योजकांच्या सहभागाने दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ई-समिट झाले. विविध स्पर्धा, मार्गदर्शन, संवाद चर्चा प्रात्यक्षिक ज्ञानाने परिपूर्ण अशा या कार्यक्रमात देशभरातील सुमारे ४०० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महाविद्यालयांसाठी आयोजित केलेल्या ‘वेस्टर्न आंथ्रप्रनर्शिप चालेंज’ या कार्यक्रमात सुमारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या उद्योजकीय नाविन्यपूर्ण कल्पना व त्यामधील व्यावसायिक दृष्टिकोन या विषयावर सादरीकरण केले. ‘टेन एक्स पीच’ या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी नव्या व्यावसायिक कल्पना सादर केल्या त्या स्पर्धेमध्ये युनिटच आणि शिक्षार्थी या स्टार्टप्स कल्पनांनी भांडवली गुंतवणूक मिळवली. बिझनेस एक्सपो या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्पादनांचे स्टॉल उभे केले ‘ट्रेड वॉर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रेडिंग विषयात निर्णय कसा घ्यावा या विषयात विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल असे मार्गदर्शन करण्यात आले. ‘आयपीएल ऑक्शन’ तसेच गेमिंग या छोट्या स्पर्धा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित केल्या होत्या.
या दोन दिवशी उपक्रमांमध्ये संध्याकाळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र आयोजित केले होते. कंटेंट क्रियेटर प्रसाद विधाते, विनोदवीर सोमेश शर्मा व डीजे दिपांशू रोहेला यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत कथन केले. दुसऱ्या दिवशी उद्योजक खालीद वानी, प्रणित मोरे व ईशा झंवर या तरुण उद्योजकांच्या अनुभव कथनाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ईशा झंवर यांनी, सकरात्मक सुरुवात,सातत्य,संयम ठेवा स्वप्न साध्य होईल अशा शब्दांत अनुभव शेअर केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ई-सेल अध्यक्ष रेवा पाटील, प्रा.विदुला वास्कर-पाटील, डॉ. सचिन शिंदे, डॉ.जितेंद्र भाट यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रोत्साहन दिले.