केआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीर
schedule08 May 25 person by visibility 310 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन राजू पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे. पवार यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात पीएचडी केली आहे. ‘महाराष्ट्रातील विद्यापीठामधील ज्ञान संशाधन केंद्रांच्या डिजीटल ग्रंथालय सेवा प्रदान करण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आयसीटी क्षमतांचे मूल्यांकन : एक अभ्यास’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. त्यांना, न्यू कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. आर. पी. आडाव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना, शिवाजी विद्यापीठ ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. बी. पाटील, प्रा.डॉ. वाय. डी. जाधव व शिक्षकांचे सहकार्य लाभले. पवार हे नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांचे नामांकित जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.