बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागर
schedule09 May 25 person by visibility 41 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आगामी महानगरपालिकेची निवडणूक महायुती सक्षमपणे लढवून जिंकणारच आहे. एकूणच राज्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकजुटीने सुरु केलेली लोकहिताच्या कामाची पद्धत नागरिकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. येणाऱ्या सर्वांचे स्वागतच आहे, परंतु, महायुती कोणावरही अवलंबून नाही हे गेल्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या कौलावर दिसून आले आहे.’असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. क्षीरसागर म्हणाले, ‘शहरातील मतदार महायुतीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शहर विकासाद्वारे शहराचे बदलत चाललेले रुप त्यातून मतदारांच्या व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यातून नागरिकांनीच महायुतीला निवडून देण्याचे मनोमन ठरविले आहे. येणारी महानगरपालिका महायुती एकजुटीने लढवून, जिंकून दाखवेल,’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे. परंतु, गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शाखा उद्घाटन, शासनाच्या योजना यामाध्यमातून जनसंपर्क वाढवा.’असे ही क्षीरसागर म्हणाले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, शहर समन्वयक सुनील जाधव, गणेश रांगणेकर, कमलाकर जगदाळे, तन्वीर बेपारी, प्रभू गायकवाड, अर्जुन आंबी, अंकुश निपाणीकर, विनय वाणी, मुकुंद सावंत, कपिल केसरकर, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, संदीप चीगरे, देवेंद्र खराडे, मुन्ना तोरस्कर, अमर क्षीरसागर उपस्थित होते.