महापौर -उपमहापौर निवडीसाठी सहा फेब्रुवारीला विशेष सभा
schedule24 Jan 26 person by visibility 61 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर –उपमहापौर निवडीसाठी सहा फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभा होणार आहे. या विशेष सभेसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता विशेष सभा होत आहे. महापालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी २०२६ रोजी मतदान झाले होते. यंदा झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ४५ उमेदवार निवडून आले. तर काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे अनुकक्रमे ३४ व एक असे ३५ नगरसेवक आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक नगरसेवक आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिकेने महापौर व उपमहापौर निवडीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तारीख व वेळ कळवावी असा प्रस्ताव पाठविला होता. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम कळविला आहे.