वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर
schedule24 Jan 26 person by visibility 8 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील मल्टिस्टेट वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश घाळी व उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सहायक उपनिबंधक करवीर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रेम राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडीचा कार्यक्रम झाला.सभेला संचालक राजेंद्र माळी, राजशेखर येरटे, प्रकाश दत्तवाडे, शशिकला निल्ले, संदीप नष्टे, सिद्धांत पाटील बुद्धिहाळकर, श्रीशैल चौगले, चेतन देसाई, रोहन लकडे, सुषमा तवटे, अभिजीत सोलापुरे, वरुण पाटील, विद्या पाटील वंदूरकर, गुरुदेव स्वामी उपस्थित होते. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.