Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञानवत्सल स्वामींचे प्रेरणादायी भाषण, भारावलेले विद्यार्थी अन् जीवनात सफल होण्याचा सक्सेस मंत्रामहापालिकेतील अधीक्षक विलास साळोखेना लाच घेताना अटक करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्स

जाहिरात

 

महापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !

schedule23 Jan 26 person by visibility 300 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीनंतर साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडी आता पुढील आठवडयात होणार आहेत. नगरविकास विभागाकडून महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर निवडीच्या कार्यक्रमाची प्राथमिक रुपरेषा जाहीर केली आहे. ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत महापौर व उपमहापौर निवडीसाठी नगरसेवकांची बैठक घ्यावी असे सुचविले आहे. ३१ जानेवारी रोजी शनिवार असल्यामुळे तीस जानेवारी, शुक्रवारी महापौर व उपमहापौर निवड होऊ शकते. दरम्यान यासंदर्भातील अधिकृत कार्यक्रम विभागीय आयुक्त जाहीर करतात. निवड सभेचे अध्यक्ष तथा पीठासन अधिकारी व तारीख विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर होते. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने, विभागीय आयुक्तांकडून महापौर निवडीची तारीख व वेळ मिळावी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्या संबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. पंधरा जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान झाले. सोळा जानेवारीला मतमोजणी झाली. त्यानंतर उत्सुकता लागली आहे ती, महापौर व उपमहापौर निवडीकडे. नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक रुपरेषानुसार २७ किंवा २८ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांनी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेत नगरसेवकांची सभा घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes