Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
धूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !शु्क्रवारी शाळा सकाळी भरणार

जाहिरात

 

नगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणार

schedule23 Jan 26 person by visibility 55 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले.सगळया पक्षांनी ताकतीने निवडणूक ल ढविली.  पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या. राज्यस्तरावरील नेते प्रचारात उतरले. दरम्यान आता पदाधिकारी निवडीपासून गटनेता निवडीपर्यंत सगळया गोष्टींची मान्यता आता प्रदेश पातळीवरुन होणार असे चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांच्या पसंतीद्वारे गटनेता निवडण्याचे ठरविले. नगरसेवकांकडून बंद पाकिटात गटनेत्याचे नाव घेऊन ते प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. आणि गटनेत्याची निवडही मुंबईतून प्रदेश कार्यालयातून होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता या महत्त्वपूर्ण पदाच्या अनुषंगााने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नूतन नगरसेवकांची बैठक झाली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिणीस विराज चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रास्ताविकात बैठकीची रूपरेषा सांगितली. 
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहणे, आपल्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील समस्या सोडवणे सर्वांशी एक दिलाने वागून पक्ष विस्तार, पक्षाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. यानंतर गटनेता निवडी प्रक्रिया संदर्भात सर्व भाजपा नगरसेवकांनी कोऱ्या लिफाफ्यामधून गटनेता म्हणून आपली पसंती लिहून पाकिटात नाव दिले. हे लिफाफे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यानंतर मुंबई प्रदेशातूनच गटनेता नियुक्तीची घोषणा होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes