समाजकल्याण अधिकारी दीपक घाटेंची सहाय्यक आयुक्तपदी बदली
schedule17 Jul 23 person by visibility 1027 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची समाजकल्याण आयुक्तालय पुणे येथे सहाय्यक आयुक्त (सहकार) या पदावर बदली झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
सोलापूर येथील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य श्रीमती छाया गाडेकर यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग येथील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य पी. बी. जाधव यांची सांगली येथे याच बदली झाली आहे.
नागपूर येथील समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. चंद्रपूर येथील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य व्ही. एम. वाकुलकर यांची जळगाव उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य म्हणून बदली झाली. वाशिम येथ्लील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य श्रीमती छाया कुलाल यांची परभणी येथे बदली झाली. समाजकल्याण पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी यांना एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. ठाणे येथील जिल्हा प्रमाणपत्र समिती संशोधन अधिकारी श्रीमती यु.व्ही. सपकाळ यांची संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी पालघर येथे बदली झाली.
बुलढाणा येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती अनिता राठोड यांना एक वर्ष मुदतवाढ दिली. पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आर. के. भोसले यांची सहायक आयुक्त समाजकल्याण गोंदिया येथे बदली झाली.
समाजकल्याण आयुक्तालय पुणे येथील विशेष अधिकारी श्रीमती मनिषा फुले यांची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे येथे सहायक संचालकपदी बदली झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची समाजकल्याण आयुक्तालय पुणे येथे सहाय्यक आयुक्त (सहकार) या पदावर बदली झाली. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारीपदी नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश अजून निघाले नाहीत.