‘शहीद’ महाविद्यालयाच्या मुलींनी गाजवली नेपाळमधील स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मिळवली पदके
schedule17 Mar 21 person by visibility 1008 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
नेपाळ येथे झालेल्या सहाव्या इंटरनॅशनल जुनियर कराटे चॅम्पियन स्पर्धेत तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी पदके मिळविली. बारा आणि तेरा मार्च या कालावधीत काठमांडू येथे स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये विविध देशातून ५०० स्पर्धक सहभागी झाले होते.
.या स्पर्धेमध्ये काता व कुमिते प्रकारामध्ये भारतीय संघाने ९५ पदके मिळवली. या स्पर्धेत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच शहीद महाविद्यालयातील बी. सी. ए. आणि बी. एस्सी. आय. टी विभागात शिकत असलेल्या विद्या मगदूम ४५-५० किलो वजन गटात काता व कुमिते मध्ये रौप्यपदक, साक्षी पाटील ४०-४५ किलो वजन गटात कुमीते रौप्यपदक व काता प्रकारात कास्य पदक, सायली चौगले ४०-४५ किलो वजन गटात कुमीते प्रकारात कास्य पदक, रोशनी कुंभार ३५-४० किलो वजन गटात कुमीते प्रकारात कास्य पदक तसेच रोशनी पाटील हिने २० वर्षावरील मुली मध्ये काता प्रकारात कास्य पदक मिळवले.
या स्पर्धेत धवल कामगिरी करत या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी
राधानगरी तालुक्यासोबत देशाचे नावही उंचावले. या स्पर्धेसाठी पालकांचे, तसेच सकाईचे (SKAI) अध्यक्ष सिहान पिसाळ, सेन्साई सुषमा पिसाळ, वैभव अस्वले, सिद्धी वरुटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शहीद महाविद्यालयाचे मेंटर डॉ. जगन्नाथ पाटील, अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, बीसीए विभागाच्या विभाग प्रमुख अहिल्या पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.