नाइट कॉलेजच्या खेळाडूची जर्मनीतील स्पर्धेसाठी निवड, विद्यापीठातर्फे शुभेच्छा
schedule19 Jul 25 person by visibility 52 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. नाईट कॉलेज ऑफ कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेला आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सराव करणारा विद्यार्थी खेळाडू अभिषेक देवकाते याची जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये अॅथेलेटिक्समधील दहा हजार मीटरच्या शर्यतीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कुलगुरूंनी त्याचा सत्कार करून स्पर्धेमध्ये भरीव यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव गजानन पळसे, प्रशिक्षक प्रकुल मांगोरे-पाटील, अमोल अळवेकर उपस्थित होते.