शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी सत्यजित कदम !
schedule07 Mar 25 person by visibility 197 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना, कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण-शहरी) समन्वयकपदी सत्यजित शिवाजीराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यात व मताधिक्क्य देण्यासाठी कदम यांचाही वाटा आहे. कदम हे महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. उत्तम संघटन व जनसंपर्क आहे. शिवसेना नेत्यांनी, त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. शिवसेना संघटना वाढीसाठी कामाला चालना मिळणार आहे.तसेच जिल्ह्यात शिवसेना भवन उभारण्याची जबाबदारी शिंदे यांनी कदम यांच्यावर सोपविली आहे.