सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी आनंदयात्रा कार्यक्रम
schedule22 Nov 24 person by visibility 103 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील सारस्वत विकास मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांचा ‘आनंदयात्रा’ हा एकपात्री प्रयोग रविवारी (२४ नोव्हेंबर २०२४) आयोजित केला आहे. देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात दुपारी चार वाजता कार्यक्रम होणार आहे.कुलकर्णी यांचे देशात व परदेशात ७६७ प्रयोग झाले आहेत. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. असे संयोजकांनी कळविले आहे.