कोरे अभियांत्रिकीत मंगळवारपासून संशोधन लेखन कार्यशाळा
schedule25 Jan 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर (स्वायत्त संस्था), शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत “संशोधन निधी संधी आणि प्रभावी संशोधन लेखनावर क्षमता वृद्धी” या विषयावर एक आठवड्याचा प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्यावतीने, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व पीएच.डी. संशोधकांमध्ये संशोधन लेखन कौशल्ये विकसित करणे, दर्जेदार जर्नल प्रकाशन धोरणे समजावून घेणे तसेच संशोधन प्रकल्पांसाठी निधी मिळविण्याच्या प्रक्रिया प्रभावीपणे आत्मसात करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेत डॉ. पी. एस. पाटील (संशोधन संचालक, डीवायपीएसएम, कोल्हापूर), डॉ. सी. डी. लोखंडे (डीन व प्राध्यापक, डीवायपीएसएम), डॉ. फारूक ए. एस. काझी (व्हीजेटीआय, मुंबई), प्रा. विवेक खांझोडे (आयआयएम, मुंबई), डॉ. हितेश पवार (आयसीटी, मुंबई), डॉ. अपूर्व कृष्णा कोवांडे (युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास, मलेशिया), डॉ. श्रीकांत तांगडे (इन्रिया, फ्रान्स), डॉ. टी. साऊद (आयआयटी, कानपूर), डॉ. व्ही. एम. फाळे (व्हीजेटीआय, मुंबई), डॉ. ए. सी. अदमुठे, डॉ. यू. बी. देशन्नावर व डॉ. एस. आर. अर्लिमट्टी , प्रा. डॉ. कांतीलाल नानासो ताम्हाणे ग्रंथपाल (कोरे अभियांत्रिकी) मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे संयोजक डॉ. रामगौडा बी. पाटील असून प्रा. आर. एस. कुंभार, प्रा. एम. एस. भोसले, प्रा. डी. बी. मिरजकर हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.