राजेश क्षीरसागरांची रंगकर्मींना ग्वाही, येणारी दिवाळी पहाट कार्यक्रम केशवराव नाट्यगृहात !
schedule01 Dec 24 person by visibility 157 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबाधणीसाठी सरकार युद्धपातळीवर कार्यरत आहे. त्यामुळे येणारी दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यगृहात सादर करू या अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर यांनी, नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी कोल्हापूरच्या नाट्यकर्मीतर्फे या पुर्नबांधणीसाठी अगदी अल्पावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रहाने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, माजी नगरसेवक आदिल फरास यांच्यासह विविध रंगकर्मी उपस्थित होते. प्रांरभी प्रसाद जमदग्नी यांनी स्वागत केले. राजप्रसाद धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
क्षीरसागर म्हणाले, ‘नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यातच घोषित केलेल्या निधीपैकी २५ कोटीचा निधी तत्काळ वर्ग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाशी असलेली बांधिलकी कृतिशीलपणे व्यक्त केली आहे.केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्वी असेल त्याप्रमाणेच उभे राहील यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी पद्माकर कापसे ,सुनिल घोरपडे, कलाशिक्षक सागर बगाडे, नितिन सोनटक्के, गायक दिनेश माळी आदी उपस्थित होते.