राजेश क्षीरसागरांच्या तडाखेबंद भाषणांनी गाजली पापाची तिकटीची सभा
schedule15 Nov 24 person by visibility 100 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :गेल्या पंधरा वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यापूर्वी दहा वर्षे राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा सवाल महायुतीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केला.पापाची तिकटी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेत्या आमदार जयश्री जाधव, निरीक्षक उदय सावंत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आदी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो मी आयुष्यात कधी चुकलो नाही आणि चुकणारही नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. माझ्या प्रचारसभाना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांना धडकी भरली असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी, कोल्हापूर महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या नेत्यांनी क्षीरसागर यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, असे आव्हान त्यांनी दिले.
स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या राजेश लाटकर यांनी पालिकेत केलेला कारभार जनतेला चांगलाच ठाऊक आहे. ते सर्वसामान्य आहेत तर मग त्यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेतीन कोटी रुपये कशी, याचे उत्तर जनतेला द्यावे, असेही फरास म्हणाले.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, बाळासाहेब काळे, आनंदराव माजगावकर, विश्वनाथ सांगावकर, भरत काळे, शिवाजी गवळी, बबन गवळी, संदीप ढणाल, अभिजित गजगेश्वर, सचिन ढणाल, प्रकाश भालकर, अक्षय कुंभार, अरविंद दुर्गुळे, पप्पू रजपूत, आशिष पाडळकर, प्रकाश भोसले, निलेश हंकारे, अवधूत कलकुटकी, राहुल खुपेरकर, सचिन भोळे, नितीन ब्रम्हपुरे, सुमित ब्रम्हपुरे आदी उपस्थित होते.