राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण
schedule09 May 23 person by visibility 1674 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी कसबा बावडा येथील नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कारखान्याच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या. राजाराम कारखान्याची नुकतीच झालेली पंचवार्षिक निवडणूक प्रचंड गाजली होती. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी केले होते. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. ऊस दरावरून जुगलबंदी रंगली. सभासद पात्र -अपात्र, विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध कारणाने ही निवडणूक गाजली होती. निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने २१ पैकी २१ जागा जिंकत कारखान्यावर सहाव्यांदा वर्चस्व राखले. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीकडून अमल महाडिक यांनी कारखाना तर्फे सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना मांडल्या. तसेच नजीकच्या काळात को जनरेशन प्रकल्प डिस्टनरी प्रकल्प कार्यान्वित केले जाईल याची ग्वाही दिली. सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत एक हाती सत्ता सोपवली.
दरम्यान सोमवारी झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी सत्ताधारी आगाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, सत्यजित कदम, अशोक पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक् व उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर होतात समर्थक आणि फटाक्यांची आतषबाजी केली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बैठकीला संचालक दिलीप पाटील, शिवाजी रामा पाटील, दिलीप उलपे, विजय वसंत भोसले, संजय मगदूम, सर्जेराव भंडारे, विलास जाधव, सर्जेराव पाटील, तानाजी पाटील, मीनाक्षी पाटील, गोविंदा चौगुले, डॉ. विश्वास बिडकर, नंदकुमार भोपळे वैष्णवी नाईक, कल्पना पाटील, संतोष पाटील, सुरेश तानगे, डॉ. मारुती किडगावकर आदी उपस्थित होते.
राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण
schedule09 May 23 person by visibility 1676 categoryराजकीय