राहुल आवाडे अभी बच्चा, धनंजय महाडिकानी दोन लाख 70 हजार मतांचा कार्यक्रम आठवावा- सतेज पाटील
schedule03 Jan 26 person by visibility 240 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक व आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या टीकेचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस कमिटी येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी, " राहुल आवाडे अजून लहान आहेत. अभी तो वो बच्चा है. त्यांच्या टीकेवर बोलणे योग्य ठरणार नाही " असे उत्तर देत बेदखल केले. तर खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीत दोन लाख 70 हजार मतांनी झालेला कार्यक्रम आठवावा असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून आमदार पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले तसेच टीकास्त्र सोडले होते.आमदार आवाडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना चांगलाच समाचार घेतला होता याकडे पत्रकारानी लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, इचलकरंजीचा पाणी प्रश्न त्यांनी सोडून दाखवायला हवा होता. त्यांच्याकडे सत्ता आहे, आमदार आहेत. पण ते काही ठोस कार्यक्रम देऊ शकले नाहीत आम्ही तो प्रश्न सोडवू. राहुल आवाडे अजून लहान आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही असे सांगत पाटील यांनी जादा बोलणे टाळले.
भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीचे 75 नगरसेवक निवडून येतील काँग्रेसचे तीन-चार नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची पुढील विधान परिषदेची निवडणूक अवघड आहे. ते आमदार आमदार होण्याची शक्यता नाही असे शाब्दिक वार केले होते. धनंजय महाडिक यांच्या या टीकेवर बोलताना आमदार पाटील यांनी, " कोल्हापूरच्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे कोल्हापूरची जनता काँग्रेसला स्पष्ट बहुमत देईल. किती जागा मिळतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. पण बहुमत काँग्रेसला असेल. खासदार महाडिक यांनी भूतकाळ आठवावा. लोकसभा निवडणुकीत त्यांचा दोन लाख 70 हजार मतांनी कार्यक्रम झाला होता झाला होता. त्यांनी आवाहन करावे आणि कोल्हापूरच्या जनतेने ऐकावे असे होत नाही. ते राज्यसभेचे खासदार आहेत बोलताना तारतम्य ठेवावे असेही पाटील म्हणाले. महापालिकेच्या मागील 10-15 वर्षाच्या कामकाजावरून माझ्यावर टीका करताना त्या सत्तेमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर देखील सहभागी होते हे लक्षात ठेवावे असा सल्ला आमदार पाटील यांनी दिला.