कोल्हापुरात 495 अर्ज मागे ! 325 उमेदवार रिंगणात !!
schedule02 Jan 26 person by visibility 295 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 20 प्रभागातून 325 उमेदवार रिंगणात राहिल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात शुक्रवारी (दोन जानेवारी) पर्यंत 495 उमेदवारी अर्ज माघार घेतली. महापालिका निवडणूक साठी एकूण 820 अर्ज दाखल झाले होते. यंदा महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी कंबर कसली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडी –राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष- आम आदमी पक्ष यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू आघाडी केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानेही २९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. 81 नगरसेवक निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
महापालिकेच्या वीस प्रभागात निवडणूक होत आहे. १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर वीस क्रमांकाचा प्रभागात पाच सदस्य आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी तब्बल दहा वर्षांनी मतदान होत आहे. २०१५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये महापालिका सभागृहाची मुदत संपली. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे.
दरम्यान आता होत असलेल्या निवडणुकीसाठी मोठया संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षाकडे उमेदवारांचा कल दिसून आला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली होती. बंडखोरी थांबविण्यासाठी गेले दोन दिवस पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. नेतेमंडळींनी लक्ष घातल्याने घडामोडी वेगावल्या होत्या. कोणाला स्वीकृत नगरसेवकपद तर कोणाला अन्य समितीवर संधी देण्यात येईल असा शब्द दिला गेला. दरम्यान दिवसभर माघारीच्या अनुषंगाने घडामोडी सुरू होत्या.
उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, स्थायी समितीचे माजी सभापती इंद्रजित सलगर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा समावेश आहे. यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार योगिता कोडोलीकर, श्रुती अमित पाटील, गीता अजित तिवडे, किरण रामचंद्र माजगावकर, नम्रता राकेश महाडिक, ऋतुजा अजित जाधव तेजस्विनी विजयसिंह माने, परवेज दिलावरखान पठाण, धनश्री तोडकर यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी २०५ उमेदवारांनी माघार घेतली. तर या निवडणुकीत माघार घेतलेल्या एकूण उमेदवारांची संख्या २७४ इतकी आहे.