तळमळ शहर विकासाची…काम धडाडीचे !
schedule03 Jan 26 person by visibility 25 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : समाजसेवेचा वारसा लाभलेल्या… राष्ट्र सेवा दलाच्या विचारात वाढलेला आणि शहर विकासाची तळमळ असणारा कार्यकर्ता म्हणजे राजेश भरत लाटकर. कोल्हापुरातील एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. स्थायी समिती सभापती म्हणून काम करताना त्यांनी लोकसहभागातून शहर विकास ही संकल्पना राबविली. प्रभागात पायाभूत सुविधांची उपलब्धता करुन देतानाच शहर विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करण्यावर त्यांचा फोकस आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवार आहेत. काँग्रेसच्या हात चिन्हावर लढत आहेत.
२०१० ते २०१५ या कालावधीत त्यांनी विचारेमाळ या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करताना मतदारसंघात विविध विकास योजना राबविल्या. प्रभागात दर्जेदार रस्ते केले. गटर्स, ड्रेनेजचा प्रश्न सोडविला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कचरा उठाव नियमित सुरू झाला. तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू म्हणून ओळख निर्माण केली. महापालिका सभागृहात त्यांनी विविध विषयावर वाचा फोडली. अभ्यासू नगरसेवक म्हणून अल्पावधीतच प्रतिमा निर्माण झाली. सभागृहातील त्यांची भाषणे गाजली. पक्षाने त्यांच्यावर २०१३ मध्ये स्थायी समिती सभापतीपद सोपविली. या पदावर काम करताना त्यांनी लोकसहभागातून शहराचा विकास हे सूत्र ठेवले.
प्रभागासाठी झपाटून काम करण्याची वृत्ती लोकांच्या पसंतीस उतरली. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी सूरमंजरी लाटकर या शाहू कॉलेज प्रभागातून निवडून आल्या. त्यांनीही महापालिका सभागृहात कायदा व नियमावलींची सांगड घालत विविध विकासकामांना चालना दिली. सभागृहातील चर्चेत त्यांचा सहभाग असायचा. पक्षाने त्यांची महापौरपदी निवड केली. त्या पदाला साजेशी कामगिरी त्यांनी केली.
समाजकारण व राजकारणात सक्रिय असलेले लाटकर कुटुंबीय. राजेश लाटकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे, नेतेमंडळींनी एखादी कामगिरी सोपविली की ते मोहिम फत्ते. सध्या ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढविली. ८० हजारांहून अधिक मते घेतली. शहरविकासाच्या विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात ते आघाडीवर. लढवय्या कार्यकर्ता, अभ्यासपूर्ण भाषण आणि काम करण्याची धडाडी यामुळे लाटकर हे महापालिका सभागृहात हवेत अशी साऱ्यांची धारणा आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.
………………………………………………