सत्यजीत जाधवांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत प्रचार फेरी, डॉ. दश्मिता जाधवांनी साधला संवाद
schedule03 Jan 26 person by visibility 72 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी मंगळवार पेठ परिसरात घरोघरी भेटी देत प्रचार केला. प्रभागातील मतदारांशी संपर्क साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. डॉ. दश्मिता जाधव या जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. मतदारांना प्रचाराची पत्रके देत आगामी निवडणुकीत सत्यजित चं जाधव यांच्या विजयासाठी भरघोस मतांनी मतदान करण्याची विंनती केली. युवा उद्योजक सत्यजीत जाधव हे विविध माध्यमातून समाजात सक्रिय आहेत. प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकाचा दृष्टिकोन ठेवत महापालिकेची निवडणूक लढवित आहेत. मॉडर्न प्रभाग बनविण्याचा त्यांचे नियोजन आहे. प्रचारफेरीत डॉ. दश्मिता जाधव या साऱ्या बाबी लोकांसमोर मांडत आहेत. आपुलकीचा संवाद, नागरिकांच्या अपेक्षा समजून घेणारी संवादशैली आणि विकासाचा स्पष्ट विचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सत्यजित जाधव यांची भूमिका थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे. मंगळवार पेठेतील विविध भागातून ही प्रचारफेरी निघाली.