आरटीई प्रवेश प्रक्रियेची निवड यादी २० जुलैला प्रसिद्ध
schedule19 Jul 24 person by visibility 554 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी आदेश दिले आहेत. सात जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्य सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासंबंधी आदेश काढले आहे.
सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी https://student.maharashtra.gov.in/adm-portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर सोमवारी, २२ जुलैपासून एसएमएस उपलब्ध होतील. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी २३ जुलै ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करावी. पडताळणी समितीमार्फत आलेल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना कराव्यात असे म्हटले आहे.
……………….
अधिकारी व पालकांना सूचना
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन सोडतीतून निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेड करण्यात यावी. पालकांना अडचण होणार नाही यासंबंधी दक्षता घ्यावी. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची