टीईटी पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापकाचाही सहभाग
schedule24 Nov 25 person by visibility 64 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात टीईटी परीक्षा होण्याअगोदरच पेपर फुटीचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. यामध्ये चार शिक्षकांचाही समावेशाची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी या प्रकरणात एका प्राध्यापकाचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या 18 जणांमध्ये त्या प्राध्यापकाचा समावेश आहे.
मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री सोनगे ते छापा टाकून टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला. तसेच सात जणांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमवारी याच प्रकरणावरून आणखी 11 जणांना पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत अटक केलेल्या 18 जणांमध्ये एक जण प्राध्यापक आहे. हा प्राध्यापक राधानगरी तालुक्यातील आहे. सध्या तो मिरज येथे नोकरीला आहे. सीनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. पीएचडी प्राप्त या प्राध्यापकाचा सार्वजनिक कार्यक्रम तसेच राजकीय पक्षांतही वावर असतो. सोमवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची राजकीय पक्षातील ऊठबस ही चर्चेची ठरली आहे.
दरम्यान टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यामध्ये कोणत्या शिक्षकांचा सहभाग आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी मार्फत तालुकानिहाय माहिती मागवली आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कडून प्रत्येक तालुक्यातील माहिती संकलित केली जात आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेतली आहे यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये ज्या प्रकारे दाखल आहेत त्यासंबंधीची माहिती ही राज्याच्या शिक्षण विभागाला दिली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.