पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रा. निशा मुडे, उपाध्यक्षपदी डॉ. जगन्नाथ पाटील, सचिवपदी विश्वजीत भोसले
schedule17 Dec 25 person by visibility 173 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 'पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया' (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. निशा मुडे - पवार, उपाध्यक्षपदी उच्च शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विशेषतज्ज्ञ डॉ.जगन्नाथ पाटील तर सचिवपदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारणीत सहसचिवपदी डॉ. अनुराधा इनामदार तर कोषाध्यक्षपदी जाहिरात संस्थेचे प्रमुख सचिन मोरे यांची नियुक्ती झाली आहे. पीआरएसआय राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी कोल्हापूर चॅप्टरची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
नवीन कार्यकारणीत समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्रा. डॉ.अंबादास भास्के, कणेरी मठ येथील विवेक सिद्ध यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर चॅप्टरच्या सल्लागार समितीत महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस.पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सहायक संचालक रवींद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांची तर विद्यार्थी नोंदणी समितीत अहमदनगर कॉलेजचे प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील डॉ.नितीन रणदिवे, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ.वृषाली बर्गे, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. तेजस्विनी कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. प्रसिद्धी समितीत संवादतज्ञ चंद्रकांत कबाडे, पत्रकार डॉ.शेखर वानखेडे, कृष्णा हॉस्पिटल कराडचे जनसंपर्क अधिकारी सुशील लाड व विवेक पोर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे.