सरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार
schedule16 Dec 25 person by visibility 78 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आर. एल. तावडे फाउंडेशन, कोल्हापूर संचलित सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार झाला. अभ्यासक्रमासाठी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता आवश्यक आहे. संबंधित सर्व मान्यता प्राप्त झाल्यानंतरच बीएस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती आर. एल. तावडे फाउंडेशनच्या सचिव श्रीमती शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांनी वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे या ठिकाणी मुला-मुलींना नर्सिंगच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध होत आहे यासाठी अँस्टर आधार हॉस्पिटल ने मुलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना रोजगाराची संधी अँस्टर आधार हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे असे सांगितले. यावेळी डॉ. डॅलॉन फर्नाडिस, डॉ. अनिलकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना रुग्णालयीन प्रत्यक्ष अनुभव, ट्रेनिंग, इंटर्नशिप व कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी नियोजन करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आर. एल. तावडे फाउंडेशन व अँस्टर आधार हॉस्पिटल यांच्यातील हा सामंजस्य करार फार्मसी शिक्षणाला उद्योग व आरोग्यसेवा क्षेत्राशी जोडणारा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी डॉ. अरविंदकर उपस्थित होते.