नूतन मराठी विद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ
schedule16 Dec 25 person by visibility 27 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खेळ आपल्याला खिलाडू वृत्ती शिकवतात जी आपल्याला आयुष्यात उपयोगी पडते असे प्रतिपादन दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रकाश मेहता यांनी केले. येथील नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलचे क्रीडा शिक्षक धनंजय पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे, क्रीडा शिक्षक विनय शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. इयत्ता दहावीमधील विद्यार्थी गौरव गुंडाजी पाटीलने गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले. शौर्य कुइगडे या विद्यार्थ्याने विभागीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांनी प्रास्ताविक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक बेदरे यांनी स्वागत केले एकता सोळुंके यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. समारंभ प्रमुख संजीवनी देशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी अरुणा वडणगेकर, अनुराधा दीक्षित, दीपा नवरे, कमलाकर जाधव यांची उपस्थित होते.