हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून वसुभूमी प्रथम
schedule17 Dec 25 person by visibility 21 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून फिनिक्स क्रिएशन, कोल्हापूर या संस्थेच्या वसुभूमी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई नाट्यधारा मंडळ, चंदगड या संस्थेच्या हायब्रीड या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि निष्पाप कला निकेतन सेवा संस्था, इचलकरंजी या संस्थेच्या मी कुमार या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक संजय मोहिते (नाटक-वसुभूमी), द्वितीय पारितोषिक परसू गावडे (नाटक-हायब्रीड), तृतीय पारितोषिक अभिजित फाटक (नाटक-मी कुमार) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक यश शिंदे (नाटक- अ युजलेस जिनिअस), द्वितीय पारितोषिक शाम चव्हाण (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), तृतीय पारितोषिक राजेश शिंदे (नाटक- हायब्रीड) नेपथ्य प्रथम पारितोषिक ओंकार चौगुले (नाटक- मी कुमार) द्वितीय पारितोषिक शिवाजी पाटील (नाटक-अग्निकाष्ट), तृतीय पारितोषिक दीपक अणेगिरीकर (नाटक-तू वेडा कुंभार) रंगभूषा: प्रथम पारितोषिक सोनम धनुकटे (नाटक-अग्निकाष्ट), द्वितीय पारितोषिक ओंकार पाटील (नाटक- संयुक्त जत्राट), तृतीय पारितोषिक सदानंद सूर्यवंशी (नाटक- एक औरत हिपेशिया भी थी) संगीत दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक ऋषिकेश देशमाने (नाटक- वसुभूमी), द्वितीय पारितोषिक राणी लोहार (नाटक- हायब्रीड), तृतीय पारितोषिक विरेश लोखंडे (नाटक- काखंत कळसा न गावाला वळसा) वेशभूषाः प्रथम पारितोषिक डॉ. राजश्री खटावकर (नाटक-वसुभूमी), द्वितीय पारितोषिक संजना परब (नाटक-वायव्यनगर) तृतीय पारितोषिक अनुथा नागवेकर- देसाई (नाटक- एक औरत हिपोशिया भी थी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रफुल्ल गवस (नाटक- सुर्य पाहिलेला माणूस) व स्नेहल बंडगर (नाटक- मी कुमार), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पार्थ घोरपडे (नाटक- अ युजलेस जिनिअस), सुशांत करोशे (नाटक-संयुक्त जत्राट), अमित कांबळे (नाटक- आज महाराष्ट्र दिन आहे), सौरभ कदम (नाटक- सावळे रक्तव्याज), सुभाष टाकळीकर (नाटक- तू वेडा कुंभार), राधिका शिंदे (नाटक-हायब्रीड), श्रृती कांबळे (नाटक- काळोख देत हुंकार), अनुराधा धामणे (नाटक- काखंत कळसा न गावाला वळसा), अर्णवी उपराठे (नाटक-अग्निकाष्ठ), अश्विनी कांबळे (नाटक-भांडा सौख्यभरे). दरम्यान १० नोव्हेंबर, २०२५ ते १२ डिसेंबर, २०२५ या कालावधीत राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. मुकुंद हिंगणे, श्री. गजानन कराळे आणि श्रीमती प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.