प्राथमिक दूध संस्थांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे- अरुण डोंगळे
schedule08 Jul 24 person by visibility 275 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ गोकुळने प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार करत आहे. प्राथमिक दूध संस्था पदाधिका-यांनी संस्था व दूध उत्पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. तसेच संघाच्या विविध योजना सेवासुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेऊन संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे’’ असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या १३ प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी सागर माने (कवठेसार), प्रदिप उलागडे (अकिवाट) सचिन पाटील (दोनोळी), शक्ती पाटील (उदगाव), सागर हेरवाड (तेरवाड), सुनिल आळते (दत्तवाड), राजेश खोत (शिवनाकवाडी), सुरेश सावंत (चिंचवाड) व गोकुळचे सहा.दूध संकलन अधिकारी मुकुंद पाटील उपस्थित होते.