गरजेपेक्षा जास्त झाले राजकारण, आता हवे विकासकारण- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule07 Jan 26 person by visibility 64 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘केंद्रात, राज्यात भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांची सत्ता आहे. कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दोन्ही आमदारही महायुतीचे आहेत. कोणताही जाहीरनामा महायुतीच करु शकते. कोल्हापूर शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहि्जे होता तसा गेल्या पंधरा वर्षात झाला नाही, आता हीच संधी आहे महायुतीची सत्ता आली पाहिजे. गरजेपेक्षा जास्त झाले राजकारण, आता हवे विकासकारण. ’अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली. मंत्री आबिटकर हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीनिमित्त मतदारांशी संपर्क साधत आहेत. पुढील पन्नास वर्षाचा शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगतिले. आता लोकांनीच ठरविले आहे की, महायुतीची सत्ता आली तरच शहराचा विकास होऊ शकतो. यामुळे निश्चितपणे कोल्हापुरातील जनता महायुतीच्या पाठीशी राहील. महायुती सक्षम आहे, कोणत्याही टीमची आवश्यकता आहे. थेट पाइपलाइनपुरता कोल्हापूर राहिले नाही. कोल्हापूर विकासाची प्रचंड कामे आहेत. कोल्हापुर शहराच्या गरजा खूप आहेत. ती विकास कामे करण्याची जबाबदारी आहे. महायुतीच्या हाती सत्ता द्यावी यासाठी संपर्क साधत आहे.’