Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पूरग्रस्तांना मदत, विवेकानंद कॉलेजचा पुण्यात सन्मान ! उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गौरव!!रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन,  प्रशासनाची चालढकल ! !कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोलमेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात जागा मंजूर, पाच एकर जागा उपलब्धवारसा हा दगड विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक - नंदिता घाटगेकागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !ज्येष्ठांच्या हक्कासाठी मंगळवारी कोल्हापुरात सन्मानवारी

जाहिरात

 

रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

schedule21 Nov 25 person by visibility 53 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘रस्ते कामात कसलीही तडजोड नको, दर्जेदार बनवा. अधिकाऱ्यांनी वारंवार रस्तांच्या कामांची पाहणी करावी.’अशा सक्त सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी रिंगरोड परिसरात महापालिकेतर्फे हॉस्पिटल व झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली.

कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंबंधी आमदार महाडिक यांनी शुक्रवारी, २१ नोव्हेंबर (२०२५ )महापालिकेत बैठक घेतली.  महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्म, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. झूम प्रकल्पात बायोगॅस तयार होतोय. त्यापासून वीज बनवण्यात येत आहे. पण त्याला मर्यादा आहे. मोठया प्रमाणात बायोगॅसची निर्मिती होत आहे. त्यामुळं हा गॅस सीएनजीमध्ये रूपांतरीत करण्यासाठी यंत्रणा बसवणं गरजेचं आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा प्रकल्प झाला तर महापालिकेला दरवर्षी साडेतीन कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितलं. सीएनजी गॅस प्रकल्पाचा आराखडा बनवून द्यावा, पालकमंत्री, आमदार राजेश क्षीरसागर मिळून केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.
कोल्हापूर शहरातील कचर्‍याचा उठाव करण्यासाठी ५० टीपरची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारकडे निधी मागणी करून कचर्‍याचा उठाव आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागानं प्रयत्न करावेत. तसेच महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सरकारने शेंडा पार्क इथली पाच एकर जागा दिली आहे. त्या जागेत इमारत बांधणीचा आराखडा त्वरीत तयार करावा, निधीसाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वस्त केले.

 शहरातील दोन ते तीन उद्यानं मॉडेल उद्यानं बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध केला जाईल, असेही आमदार महाडिक यांनी नमूद केलं. शहरातील केएमटीचे बस स्टॉप खराब झाले आहेत. हे बस स्टॉपही अद्ययावात करणे गरजेचं आहे. पंचगंगा स्मशानभूमीची जागा अपुरी पडत आहे. या ठिकाणी येणार्‍या लोकांना वाहनं लावता येत नाहीत. त्यासाठी नवीन जागा शोधावी, अशी सूचनाही त्यांनी केली. रिंगरोड परिसरात महापालिकेचं हॉस्पिटल सुरू करता येईल का, याची चाचपणी करावी. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर चौकात हॉस्पिटलसाठी आरक्षित जागा आहे. त्याठिकाणी हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न करू, असं शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes