Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
माणूस व्यथा सांगू शकतो, झाडे व्यथा सांगू शकत नाहीत –त्यांचा श्वास मोकळा करा : प्रकाश आबिटकरव्यवसाय परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे ने घेतल्यास बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनइशरे कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी अवेस अहमद हुसैनी, सचिवपदी विजय पाटीलयूपीएससी परीक्षेतील यशवंतांचा गोकुळला अभिमान- चेअरमन अरुण डोंगळेखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला राष्ट्रीय  सहकार रत्न संस्था गौरव पुरस्कारखासदार महाडिकांची शिये गावाला भेट, स्वच्छता मोहिमेत सहभाग, सरकारी योजनांचा आढावाडॉ संजय चव्हाण यांच्या संशोधनाला जर्मन पेटंट, रासायनिक संयुगाचा शोधसीईटी सेलचे गणित चुकले, पंधराहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे पर्यायच चुकीचे ! सीएमओ ऑफिसकडे तक्रार !! कोरे अभियांत्रिकीमध्ये ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानफावल्या वेळेचा सदुपयोग, वर्गातील सगळया विद्यार्थ्यांनी केल्या कविता ! साकारला कवी उमलताना कवितासंग्रह !!

जाहिरात

 

डॉ संजय चव्हाण यांच्या संशोधनाला जर्मन पेटंट, रासायनिक संयुगाचा शोध

schedule28 Apr 25 person by visibility 317 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांनी आपल्या संशोधक विद्यार्थ्यांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाच्या अनुषंगाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाला नुकतेच जर्मन पेटंट मिळाले आहे.
'सिस्टीम फॉर प्रिपेरिंग बायन्युक्लिअर कॉपर कॉम्प्लेक्सेस विथ कार्बन रिच अल्कीनील फंक्शनलाइज्ड सॅलिसिलीडीमाईन' या विषयावर विद्यापीठाच्या  डॉ.  चव्हाण आणि त्यांचे विद्यार्थी अजित देशमुख, नमिता नाईकनवरे, कुमार चौधरी यांनी संशोधन केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डाटा ट्रान्स्फर, इमेज प्रोसेसिंग, लेझर तंत्रज्ञान इत्यादी बाबींसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी डॉ. चव्हाण यांना भारत सरकारच्या ‘डीएसटी-सर्ब’कडून संशोधन प्रकल्प प्राप्त झाला होता. त्यासाठी ३० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर झाले.
या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना डॉ. चव्हाण म्हणाले, कृत्रिम असेंद्रिय (सिंथेटिक इनऑर्गेनिक) रसायनशास्त्रामध्ये हे संशोधन महत्त्वाचे असून कार्बन-समृद्ध घटकांची रेषीय संरचना आणि इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशनमुळे हे घटक डेंड्रायमर्स किंवा सुप्रामॉलेक्युलर असेंब्लीज तयार करण्यासाठी आदर्श ठरतात. ही असेंब्ली म्हणजे मूलद्रव्यामधील अतिसूक्ष्म अशी स्तरित संरचना असते, जी साधारणपणे एखाद्या झाडावरील पानांच्या रचनेप्रमाणे असते. नॅनोस्केल ऑप्टिकल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाश उत्सर्जक उपकरणांच्या विकासासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच, या संयुगांमध्ये आम्ल अथवा आम्लारी प्रेरित "ऑन-ऑफ" ल्यूमिनसन्स स्विचेस (प्रकाश चालू-बंद करण्याची क्षमता) म्हणून कार्य करण्याची क्षमता असते. तसेच सामान्य तापमानात उच्च फोटोप्रेरित कॅटॅलिटीक (उत्प्रेरक) क्रियाशीलता दर्शविल्यामुळे, त्यांचा वापर प्रगत लेझर उपकरण निर्मितीसाठी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रो-ऑप्टिक उपकरणांच्या विकासामध्येही उपयुक्त ठरेल.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes