शिवाजी विद्यापीठातील पाच संशोधक प्राध्यापकांच्या संशोधनाला पेटंट
schedule15 Nov 24 person by visibility 1497 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्रा. डॉ. अवीराज कुळदीप, डॉ. राहुल माने, डॉ. किशोर खोत, डॉ. सुहास मोहिते, डॉ. के एम. गरडकर यांच्या ' वेस्ट टू वेल्थ ' या संकल्पनेवर आधारित 'सेमीकंडक्टर फोटोकॅटालिस्ट' निर्मितीस यूके डिझाईन पेटंट जाहीर झाले.जुलै 2023 मध्ये डॉ. कुळदीप यांना भारत सरकारच्या स्वच्छता सारथी फेलोशिप साठी निवड झाली होती.त्या मध्ये त्यांनी पंचगंगा नदीचे दूषित पाणी, त्याचे कोल्हापूर व इचलकरंजी शहरांमधील प्रदूषणाचे उगम स्थान व प्रदूषित पाण्यावर 'सेमीकंडक्टर फोटोकॅटालिस्ट' चा उपाय यावरती माहिती सादर केली होती. याच कार्यासाठी त्यांना युके सरकारचे पेटंट मिळणे ही शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर साठी मानाची बाब आहे.
काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे 'सेमीकॉन इंडिया 2024 ' या कंपनीचे उद्घाटन केले. भारत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करून तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करत आहे. दळणवळण, संरक्षण, ऑटोमोबाईल्स आणि संगणकीय उपकरणांसह जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये सेमीकंडक्टरचे अनुप्रयोग आहेत. जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीमध्ये भारताची मोठी भूमिका आहे आणि सेमिकॉन इंडिया भारतातील सेमीकंडक्टर इकोसिस्टमला आकार देणाऱ्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यासाठी एक व्यासपीठ देईल. याच अनुषंगाने सहकाऱ्यांनी सेमिकंडक्टर फोटो कॅटलिस्ट चा उपयोग प्रदूषित पाणी प्रदूषण रहित करण्यासाठी केला व त्यास युके गव्हर्मेंट चे पेटंट जाहीर करण्यात आले त्यांनी 'वेस्ट टू वेल्थ' या संकल्पनेवर आधारित केले आहे.
त्यांना कुलगुरू डी. टी.शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील, कुलसचिव डॉ . व्ही. एन.शिंदे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के. डी सोनवणे, डॉ.जी. एस. राशिनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.